Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mrudula Raje

Inspirational

3  

Mrudula Raje

Inspirational

एकाकी

एकाकी

1 min
709


एकाकी


सरकारी इस्पितळाच्या एका ओसाड, जीर्ण शीर्ण वाॅर्डमध्ये एकाकी पडला होता तो रुग्ण।

माहीत होते त्याला , की त्याच्या जीवनाची किंमत आहे शून्य॥


असाध्य, दुर्धर आजाराच्या रोग्यांनाच आणले जात होते त्या वाॅर्डात।

जीवन संपायची वाट बघत, विव्हळत पडत होते ते; जसे इंजिनपासून सुटलेले , तुटके-फुटके डबे , पडून असतात रेल्वेच्या यार्डात॥


एक , एक, करत , मग सर्वच गेले माॅर्गच्या दिशेने।

हा सुध्दा वाट पाहतोय, आपला नंबर कधी लागणार ह्या आशेने॥


असह्य कळा, शरीराचा दुर्गंध, साहवत नव्हते त्याला स्वतःचेच जिणे।

कोण परिचारिका फिरकणार त्याच्याकडे, ऐकायला त्याचे रडगाणे? ॥


दिवसातून एकदा डाॅक्टर येई, तो जिवंत आहे का ते पाहायला।

आणि मग नकारार्थी मान हलवत, निघून जाई त्याला एकट्याला सोडून; त्याचेच भोग साहायला!॥


मोजत होता जेव्हा तो अखेरचे आपलेच श्वास।

डाॅक्टरही मोजत होते; सेकंद, मिनिटे, आणखी तास॥


शीणला होता आता तो आपल्याच शरीराशी लढून।

विचारत होता आत्म्याला , " आता कधी रे जाणार मला सोडून?"॥


पण ' देवाकडचे बोलावणे ' येत नाही इतक्या सहजपणे।

नशिबी होते त्याच्या , हे जीवन जगणे केविलवाणे॥


अस्थिपंजर हाडांचा सापळा बनून राहिला होता , तो किरकोळ देह।

का नाकारत होता त्याच्या आत्म्याला ईश्वरही प्रवेश, हाच होता संदेह॥


आवरतच नाही हा देहाचा पसारा भरभरा।

" सोडव रे आता देवा " , हीच एक प्रार्थना परमेश्वरा!॥    


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational