एका ओळीची कविता...!
एका ओळीची कविता...!
एका ओळीची कविता लिहायची
म्हणून नवीन वही आणली
त्या सोबत नवं पेनही
खिशाला आवर्जून लावलं
वळणदार अक्षर काढण्या साठी
पाटीवर थोडी निप झिजवली
आडव्या उभ्या तिरक्या वाटोळ्या
रेघांची सराव परीक्षाही झाली
मूड साठी लांबवर फेर फटका झाला
वडा पावाचा मलिदाही पोटात गेला
घरचा जेंव्हा मी रस्ता धरला
तेंव्हा संकल्पाचा त्या बोऱ्या वाजला
न करत्याचा वार शनिवार
हे पटकन मला आठवले
चप्पल झटकन कोपऱ्यात फेकून
तडक मी हंतरुण गाठले
एका ओळीची कविता
डोक्यातच बराच वेळ घुमली
आणि मग कागदावर न उतरताच
''आनंदी आनंद'' म्हणत झोपली...!!
