एका ज्येष्ठ नागरिकाचे मनोगत
एका ज्येष्ठ नागरिकाचे मनोगत
आयुष्याच्या या वळणावर नको कुणावर भार
तुझाच रे आधार ईश्वरा तूच खरा आधार
तूच दिली ही निर्मल काया
जगी पसरली तुझीच माया
तुला सोडुनी जगी गुंतलो करावया संसार
तुझाच रे आधार ईश्वरा तूच खरा आधार
जीवनात हे शरीर झिजविले
आप्तेष्टांचे ही लाड पुरविले
अनुभवातूनी आज हे कळले प्रेम असे व्यवहार
तुझाच रे आधार ईश्वरा तूच खरा आधार
आता एकच विनंती देवा
घडो दुरितांचे हातून सेवा
हृदयात या सतत असुदे भक्तीचा संचार
तुझाच रे आधार ईश्वरा तूच खरा आधार
अंतिम समयी सरणापूर्वी
नको कुणाचा विचार या मनी
मनात माझ्या सतत असू दे विठ्ठल हा उच्चार
तुझाच रे आधार ईश्वरा तूच खरा आधार
आयुष्याच्या या वळणावर नको कुणावर भार
तुझाच रे आधार ईश्वरा तूच खरा आधार.
