STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

एक थेंब...

एक थेंब...

1 min
33

एक थेंब...

तु उभा सिमेवरती ,

कशी मिटून घेऊ डोळ्यांची पाती ,

सर येते डोळे भिजवुन जाती ,

ही तर परीक्षाच माझी ...

विरहाच्या अग्नीचा दाह,

तुलाही छळुन गेला ,

माझ्याही वाटेला आलेला,

वसंत जळून गेला...

कोरडा कोरडा जन्म ,

दुष्काळी गेला ,

एक थेंब पडता मजवर,

मोहर गुलाबी फुलला...

तु येता जिवनात सख्या,

श्रावण बरसरला ,

गारवा तुझ्या प्रेमाचा,

जन्म सुखावून गेला ...

शहारता नात्यांचा सुगंध ,

ओल्या काळजाचा बंध,

रिमझीम सरींच गीत ,

दरवळतो मनात मृदगंध...

एक थेंब पडता मजवर,

मोहर गुलाबी फुलला...

पानझडीचा ऋतु बदलता,

पालवीचा रंग खुलला ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract