एक सुंदर नात असावं
एक सुंदर नात असावं
एक सुंदर नात असावं
मनातून मनाला *जोडणार,*
वेड्या अबोल भावनांचा
अलगद सार *उलघडणार.*
काळजातील वेदनांना
सहज समजून *घेणार,*
मायेच्या आपुलकीने
मनावर फुंकर *घालणार.*
दोन भिन्न मनांना जणू
एक होताना *पहावं,*
तुमच्या आमुच्या मनातलं
एक सुंदर नात *असावं.*
