STORYMIRROR

Trupti Naware

Tragedy Inspirational

2.9  

Trupti Naware

Tragedy Inspirational

एक पक्षी

एक पक्षी

1 min
4.1K


  पाय नसलेला 

वाळवंटातला एक पक्षी

 तहानलेला

पण अस्मितेने भरलेला 

त्याचा दुबळेपणा 

घायाळ करून गेला 

पण श्वास मोजत राहिलेला

वाफाळलेल्या वाळूमधून

वाट निघत गेली ...

जखमेवरची उष्ण झालर

धीर देत गेली ...

मृगजळाची आस

नजर शोधत राहीलेला

कळत नकळतही

अदृश्य हास्यात हरवलेला

शेवटी तिथेच कळली त्याला

वाटेतल्या वाळूची फुंकर

अमृत मिळावया जगायचे

जीवन हे ऐसे जहर.....!

            


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy