STORYMIRROR

Meena Pandit

Inspirational

3  

Meena Pandit

Inspirational

एक नातं जिव्हाळ्याचं ( कविता )

एक नातं जिव्हाळ्याचं ( कविता )

1 min
362

एक नातं जिव्हाळ्याचं


असंच एक नातं जिव्हाळ्याचं,

प्रेमाचं अन् आपुलकीचं

प्रतिक मानलं जातं ते म्हणजे आईचं

अन् तिच्या तान्हुल्याचं 


नऊ महिने उरात घेऊन 

पोटच्या गोळ्याला जपायचं

अन् जीवघेण्या प्रसूतिवेदनांना

आनंदाच्या आभासाखाली

हसत हसत सहन करायचं


हळव्या मनाची ती जननी

अन् उदार काळजाची 

ती देव असते, ती

आपल्याला जन्म देऊन

जगायलासुध्दा शिकवते


आई म्हणजे आभाळ नक्षत्रांचं

अन् मग बरसणं मंद सरींचं

एवढं सारं म्हणजे आईच आई

आईशिवाय तिच्या तान्हुल्याला 

कुठलीच मिठी उबदार नाही.....


मीना पंडित, औरंगाबाद...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational