पुलवामा हल्ला ( कविता )
पुलवामा हल्ला ( कविता )
किती भयंकर हल्ला
आपल्या सैनिकांवर झाला
आपले प्राण गमवण्याइतका
असा कायच त्यांनी गुन्हा केला... ! ! !
त्या बॉमस्फोटाने उडाल्या
सैनिकांच्या शरीराच्या चिंधड्या
आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी
कित्येकांनी घेतल्या
सैन्य भरतीत उड्या
नकळत झालेल्या हल्ल्याने
सैनिकांना राहिले नाही भान
पण अशा भयानक जिवघेण्या
हल्याची खरंच आहे का
आपल्या सगळ्यांना जाण???
देशाच्या रक्षणासाठी
लढतांना वीर मरण आले
सलाम करते त्या विरांना
ज्यांनी भारतभूसाठी
आपले देह ही त्यागिले....