माणूस ( कविता )
माणूस ( कविता )
माणसाच्या व्यक्तीमत्वाचे
असतात अनेक पैलू
कधी तो असतो खेळाडू
तर कधी असतो दयालू
नोकरीच्या ठिकाणी तो
ऑफिस मध्ये जातो
सुटाबुटात अन घेऊनी
एक ब्रीफकेस हातात
ऐन उमेदीच्या काळात,
तरुणपणात बिनधास्त खेळतो
म्हातारपणात मात्र आपला
वाढविलेला बिझनेस सांभाळतो
घडत जातो माणूस
आपल्या विविध गुणांनी
आणि जिंकून घेतो सर्वांना
आपल्यातील कौशल्यांनी...
