घर ( कविता )
घर ( कविता )
घर
घरामध्ये असावी
नाती जिव्हाळ्याची
नकोत नुसत्या भिंती
आपुलकी असावी घरपणाची
मुलांना हवे
आजीआजोबा
करायला खुप लाड अन्
हट्ट पुरवायला हवे आई बाबा
आत्या नि काकाच्या
असल्यानेही
घर गजबजून जाते
सर्व भावंडांची मात्र
मजाच मजा होते
पण आता सर्वत्र
विभक्तच झाली घरे
फक्त कार्यक्रमांनाच
भेटतात सगे सोयरे....
