वेदनेने भाजलेले हात ( कविता )
वेदनेने भाजलेले हात ( कविता )
वेदनेने भाजलेले हात
देशात आपल्या का
घडताहेत बॉमस्फोट?
जातींच्या नावाखाली
का सुरू झाल्या दंगली?
भ्रष्टाचारही माजलाय
सामान्य लोकांवरील,
गरीबांवरील अत्याचार
वाढतंच चाललाय...!
सर्व काही सहन करताहेत
वेदनेने भाजलेले हात
शक्ती मिळो त्यांना
करण्यासाठी संकटांवर मात....
