स्त्री जन्माचे स्वागत
स्त्री जन्माचे स्वागत
स्वागतासाठी तुझ्या
तयारी केली मनाची
तू फुलासारखे उमलावे
ही आस तुझ्या येेण्याची
खरंच तुझ्या येण्याने
सुंदर झाले जीवन
तुझ्या चिमुकल्या पावलांनी
हर्षित केले सर्वांचे मन
सुंदर परी आहेस तु आमची
लाड करू किती बाई
अशीच आहे तु गुणाची
झाले तुझी गं आई
घर असते गजबजून
तु असतेस तेव्हा
नकळत डोळे जातात भिजून
आठवणी येतात जेव्हा
मुलगी जन्मली नाही तर
उदयाची आई होणार नाही
आणि आई झाली नाही तर
मनुष्यनिर्मितीच होणार नाही
नाही बहिण ना आई
ना बायको ना मुलगी
ना मावशी ना आत्या
वाजवावी लागेल हलगी
नसेलच स्त्री जन्म
तर माणुसकीच उरणार नाही
स्ञीविना पुरूषांना
पुर्णत्वच येणार नाही
वर्णू स्त्री सामर्थ्य किती
आहे मुलगा वंशाचा दिवा
तर मुलगी पण पणती
कुटुंबाच्या अंतरीचा ठेवा
