वेळ ( कविता )
वेळ ( कविता )
1 min
1.6K
वेळ
वेळेतून सुरू होते
दिवस आणि रात्र
फिरत राहते सतत
काळाचे हे चक्र
आहे वेळ तोवर
आनंद घ्या जीवनाचा
नाहीतर आयुष्य असेच
निघून जाईल, जर
विचार करत बसाल
पुढील भविष्याचा,
हे जीवन सुंदर आहे
वेळेची ही महिमा
घडयाळातील काटयांप्रमाणे
सतत फिरत आहे....
