STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

4  

Chandan Pawar

Tragedy

एक कहाणी / शाप

एक कहाणी / शाप

1 min
395

अशाच एका बागेमध्ये

फुलली एक कळी

नाजूक नाजूक ओठ तिचे

हसरी गालावरची खळी.


असाच एक गुणगुणणारा

भुंगा तेथे आला

सौंदर्याच्या त्या मूर्तीला

आपले सर्वस्व हो वाहिला.


लैला-मजनू, हिर- रांझाची

गाणी भुंगा गुणगुणतसे

त्याच्या प्रेमगुज शब्दांनी

कळी गाली गोड हसे.


मग असेच जुळले त्यांचे

प्रेमाचे नाजूक धागे

सोनेरी स्वप्नांच्या दुनियेत

दोघे अहोरात्र जागे.


प्रेमातच जीवनमरणाची मग

शपथ घेतली त्यांनी

प्रेम म्हणजे दुःखाश्रूंचा सागर

कधी न आले त्यांच्या ध्यानी.


अशाच एका सोनसकाळी

आला एक राजकुमार

बसली त्याच्या हृदयात

ती नाजूक कळी सुकुमार.


त्या ऐश्वयी- सुंदर अशा

राजकुमाराची झाली ती राणी

तिच्या स्मृतिआड झाला भुंगा

अन भुंग्याची प्रेमकहाणी.


वेडापिसा झाला भुंगा

तिच्या आर्त आठवणीने

त्याच्या नशिबी आले फक्त

मरता मरता जिणे.


त्या तळमळत्या प्रेमविर

भुंग्याने टाकले शापाचे जाळे

पुढे संपून जाईल प्रेम

राहतील फक्त चाळे..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy