एक दिवस
एक दिवस
एक दिवस
जमिनीवरचे किलोमीटर
पाण्यावरचे नाॕटिकल अंतर
हवेतले हवाई अंतर
उठून पळू लागले
लांबी रूंदी
लीटर मीटर
सारे सारे एक झाले
सा-या-सा-यांची सरमिसळ झाली
कुणालाच कशाचाच पायपोस उरला नाही
दाही दिशा एकत्र आल्या
दिशा चुकल्या
वाटा फसल्या
अंतर नाहीसे झाले
अंतर भुगोलातूनही नाहीसे झाले
अन् मग...
प्रवास सुरू झाला
तुडवत राहिलो पाणी
उठवत राहिलो प्रकाशाला
कापत राहिलो अंधार
अनोळखी वाटेवर
अनोळखी माणसं भेटत गेली
आपला कोण न् परका कोण समजेनासं झालं
आपला परका वाटू लागला
अनोळखी आपला वाटू लागला
तरीही प्रवास सुरूच राहिला
त्याच्यापासून त्याच्यापर्यंतचा
अंतर नसतानाही
अंतर शोधत राहिलो
दिशा नसतानाही दिशा शोधत राहिलो
आठवणीच्या जाळ्यातले धागे
उसवत उसवत दिशाहीन दिशांत
प्रवास मात्र करत राहिलो
