एक अश्रू
एक अश्रू
मधुर बोलं तर मधुर पसारा
हलकसं स्मित कुणाचा किनारा|धृ|
उमलती फुले
वाहतो वारा
सृष्टीसं देतो
सुगंधी फुवारा ~1
भरतात मेघं
फुटतात धारा
खुलते जीवन
धरुनिया दोरा ~2
नभात निपजतो
इवलासा तारा
प्रकाश देतो
आजन्म सारा ~3
एक अश्रू
करुणेचा न्यारा
कुणाशी होतो
दुःखात सहारा ~4
