ए आई
ए आई


ए आई ए आई
मला जगात येऊ दे
हे सुंदर सुंदर जग
मला डोळ्याने पाहू दे
या आजी आजोबांना
का कळत नाही
मी मुलगी असली तरी
मुलांपेक्षा कमी नाही
हे त्यांनाही आता
थोडं थोडं कळू दे
ए आई........
मुलगा मुलगी भेद
का सारे करतात
मुलाला उजवा अन्
मुलगी डावी मानतात
मुलींनाही आता
पुढं पुढं जावू दे
ए आई.....
उडण्याआधीच माझे
पंख कापू नका
थोडा विश्वास ठेवा
मी देणार नाही धोका
मलाही आकाशात
उंच उंच जाऊ दे
ए आई.....
कवी :- हरेशकुमार ना. खैरे
काटोल जि. नागपूर