STORYMIRROR

Supriya Devkar

Abstract Others

3  

Supriya Devkar

Abstract Others

द्वेष

द्वेष

1 min
199

माऊली रुजवे

मायेचे अंकुर

दुःखात घालावी 

सदैव फुंकर


वडील शिकवी

मनात जपावा 

प्रेमाचा ओलावा

 कष्टाने शिंपावा


बहिण आळवी 

साठवा क्षणांना 

प्रांजळ मनाने 

जपावे नात्यांना


भावाचा दरारा 

वाटतो प्रेमळ 

आधार जीवनी 

त्याचाच निर्मळ


पतीच्या हातात

 कर्तव्याची दोरी 

प्रीतीचे सिंचन 

द्यावे बिनघोरी


प्रेमभाव जपा 

दृढ होती नाती 

आपुलकी वाढे 

हीच ठेवा नीती


द्वेष नका करू

आधार निसटे

चांगल्या मनात 

 विचारांना फाटे 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract