दसरा
दसरा
फुले आणली झेंडूची
माळ बनवली त्या फुलांची...
रांगोळी सजली अंगणात
पहाटेच्या धुंद नभांगणात...
तोरण बांधले दारी झेंडूचे
पान ओवले त्यात आपट्याचे...
पूजाअर्चा मनोभावे केली
देवतांना झेंडू फुले सजवली....
आज आहे हो सण दसरा
हा सण करूया हो हसरा...
दुःख सारे बाजूला सारा
द्वेषही सारेजण आता विसरा....
आपट्याच्या पानांचा मान आज
देवतांना त्याचाच आहे साज....
आज तरी रागाचा नको पारा
अन्यायाला द्यायचा नाही थारा...
जाळूया सारा सुका कचरा
पावसाच्या पाण्याचा करू नीट निचरा....
नात्याची वीण घट्ट करूया
आनंदानं एकमेका आलिंगन देवूया....
