STORYMIRROR

DHANSHRI KABRA

Abstract Others

3  

DHANSHRI KABRA

Abstract Others

दरवर्षीच येतो पावसाळा

दरवर्षीच येतो पावसाळा

1 min
245

दरवर्षीच येतो पावसाळा

पण वर्षात एकदाच येतो,

उन्हाने तापलेल्या तनाला त्राण घेऊन येतो,

थकलेल्या मनाला तृप्त करण्या येतो,

मोतिगत जलबिंदूनी प्राण फुलवून देतो,

सजीव- निर्जीव संपूर्ण भूपृष्ठाचे सौदर्य खुलवितो,

लहानग्यांना रमण्याच्या संधी सोबत घेऊन येतो,

तर मोठ्यांना आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलवितो,

पशु-पक्षियांना नाचत-खेळत आनंद क्षणांची संधी घेऊन येतो,

जिभेला चहा-भाज्यांच्या चवीचा लळा घेऊन येतो,

काळया मातीतून उगवणार्‍या समृद्धी कणांची आस घेऊन येतो,

शब्दसंग्रह सुद्धा कमी पडावे एवढे आनंद उफाळून देण्या येतो,

दरवर्षीच येतो, 

पण तरीही वर्षभर आठवणीत सदा संगतीला असतो,

ना जाणे हा पावसाळा,

वर्षात एकदाच का येतो!?!?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract