STORYMIRROR

DHANSHRI KABRA

Abstract Inspirational

3  

DHANSHRI KABRA

Abstract Inspirational

काय सांगू या क्षणांनी काय काय दिले?

काय सांगू या क्षणांनी काय काय दिले?

1 min
235

रडणे दिले तर हसणे ही दिले,

स्वप्नं दिले दिले तर जगणे ही दिले,

जखमा दिल्या तर मरहम ही दिले,

अंधार दिले तर प्रकाश ही दिले,

दुःख दिले तर सुखांची चाहूल ही दिली,

काय सांगू मागे पडणाऱ्या क्षणांनी या जगण्या काय काय दिले!!

शत्रू दिले तर जीव लावणारे मित्र ही दिले,

एकटेपण दिले तर आपुलकीने जपणारी नाती ही दिली, 

द्वेष दिले तर आयुष्य सुंदर बनवणारे प्रेम ही दिले, 

परिवार दिले तर माणसांना जपायला संस्कार ही दिले,

निराशा दिली तर नावीन्यपूर्ण आशेचे किरण ही दिले,

काय सांगू मागे पडणाऱ्या क्षणांनी या जगण्या काय काय दिले!!

हिरमुसने दिले तर संधी ही दिली,

मनाची खच दिली तर शरीराची उठ दिली, 

पराभव दिले तर जिंकण्याचे सामर्थ्य ही दिले,

अपयश दिले तर यशाची चव ही दिली,

कठीण जगणे दिले तर परिस्थितीला मात देण्याची ताकद ही दिली,

काय सांगू मागे पडणाऱ्या क्षणांनी या जगण्या काय काय दिले!!

वादविवाद दिले तर जिव्हाळ्याचे साथ ही दिले,

परीक्षेचे उन्हाळी चटके दिले तर कर्तुत्वाने यशानंदाच्या पावसाळी सरी ही दिल्या,

धावत्या संधींची सुटती आस दिली तर मेहनतीला वेड्या मनाची साथ ही दिली

जिभेचे कटू सत्य दिले तर शब्दांत न गुंफता यावे इतके अभूतपूर्व अनुभव ही दिले,

काय सांगू मागे पडणाऱ्या क्षणांनी या जगण्या काय काय दिले!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract