STORYMIRROR

DHANSHRI KABRA

Others

3  

DHANSHRI KABRA

Others

प्रिय आंबा

प्रिय आंबा

1 min
156

तुझी ओळखच आहे फळांचा राजा, 

ओळख तशे लक्षण ही; 

फळांचाच नव्हे तर सर्वांच्या मनाचाही तू राजाच!!

रंग असा की डोळ्यातून पारदर्शी मनात घर करुन बसतो, 

रसाळी रूप जशे जन्मभराचे तारणे फेडते, 

किती अन् काय करावे कौतुक तुझे; 

तू तर उन्हाळ्याच्या तापत्या गर्मीलाही 

आपलासा करणारा जादूगार.

तू तर आजोळीच्या लहानपणाच्या 

आठवणीच्या जगताचा मोठा पैलू; 

किती काही साठवले तू तुझ्या मुठीभरच्या छोट्याश्या आकारात, 

हातात येताच नेतो डोळ्यांना आनंद-आठवणींच्या गावात;

खुप प्रेम साठवून ठेवलंय तुझ्या साठी आमच्या मनी,

आतुरता फक्त पुढच्या वर्षी तुझ्या चवीत रंगून बेधुंद आनंदाच्या

जगतात रमून गर्मीतही मनाला तृप्त करुन जगण्याची!!

पुढच्या वर्षी लवकर ये, फक्त चव मात्र ती जुनी

लहानपणी चाखली तशी शुद्ध अमृतासारखी सामावून ये.

तुझी वाट बघत आतुर,


Rate this content
Log in