थांबशील का माझ्यासाठी?
थांबशील का माझ्यासाठी?
1 min
280
मागे पडणाऱ्या क्षणा जरा वेळ
थांबशील का माझ्यासाठी ??
कळते मलाही ही वेळ थांबत नसते
तरी विनंती मान्य करशील का माझी,
जरा वेळ थांबशील का माझ्यासाठी ??
खूप काही अनुभवून घ्यायचय,
पुन्हा लाभलेलं भाग्य जाणून घ्यायचंय,
क्षणभर विचार न करता एकदा
वाळूसारखं निसटत चाललेल्या क्षणांना
मनसोक्त आस्वाद घेत जगायचंय,
मागे पडणाऱ्या क्षणा जरा वेळ
थांबशील का माझ्यासाठी ??
