STORYMIRROR

DHANSHRI KABRA

Abstract Inspirational

3  

DHANSHRI KABRA

Abstract Inspirational

घर

घर

1 min
228

घर बनतं रेखीव आखणीनी, 

सदाचार संस्करांशिवाय पायाचे आरंभ मात्र होत नाही.

घर बनतं कष्टांनी गाळलेल्या घामानी, 

प्रेमळ नात्यांविन मनाला शांतमय मात्र वाटत नाही.

घर बनतं चार भिंतींनी,

जिव्हाळ्याविन घरपण मात्र येत नाही.

घर बनतं दगड विटांनी,

थोरल्यांच्या कडक शिस्तीविन पक्कं मात्र होत नाही.

घर बनतं नक्षीदार छतानी,

आई बाबांच्या अथांग मायेविन छाया मात्र मिळत नाही.

घर बनतं सुरेख रंगांनी,

बहीण भावाच्या खट्याळ हसण्याविन हवहवस मात्र बनत नाही.

घर बनतं भरलेल्या तिजोरीनी,

गोड शब्द व अपुलकिविन वैभवी मात्र होत नाही.

घर बनतं त्यातल्या तेजस्वी देव्हाऱ्यानी, 

सदाचारी गोड चारित्र्याविन शोभामय मात्र वाटत नाही.

घर बनतं जीवापाड जपलेल्या नात्यांनी, 

नम्र समाधानी माणसांविन किर्तीमय मात्र वाटत नाही.

घर बनतं उदंड दारानी,

परोपकारी मोकळ्या मनाविन प्रतिष्ठित मात्र होत नाही.

घर बनतं किलबिल अंगणानी,

बहरल्या तुळशीविन शोभामय मात्र दिसत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract