STORYMIRROR

DHANSHRI KABRA

Others

4  

DHANSHRI KABRA

Others

आई!!

आई!!

1 min
276

पूर्व जन्माचे पुण्य माझे असावे,

तुझ्या वास्तल्यात ममताई मला जन्म मिळावे...

वैभवी मायेने तुझ्या अर्थहीन जन्माला अर्थ मिळावे,

स्वप्नं हे खरे ठरावे, 

आशेला ही श्वास मिळावे, 

पुढल्या जन्मी तुझ्याच पोटी जन्म मिळावे...

जन्मांतरीचे ऋण तुझ्या कुशीत विनव्याजी प्रेम मिळावे ,

शब्दांना या अर्थ मिळावे,

प्रेमाच्या ओळींना ही मोल मिळावे,

हृदयाच्या स्पंदनांना तुझे जिव्हाळ्याचे घास मिळावे...

नाही माझे व्यक्तिमत्व इतपत तुझवरती लिहता यावे,

धगधगत्या आयुष्यात शहाणपण मिळावे,

निस्वार्थ प्रेमळ नात्याला सप्तरंगांचे ही प्रकाश मिळावे,

जीवनी माझ्या तुझ्या आनंदाचे सुगंध दरवळावे...

आठवत नसलेल्या शब्दांना या तुझ्या अफाट प्रेमाचे पारणे फेडता यावे,

आनंद अश्रूंना डोळ्यात सजता यावे,

जगण्यात या तुझ्यासारखे मला ही चंदनापरी दर्वळता यावे,

मायेच्या पंखांच्या वस्तल्यात तुझ्या धडपडीच्या आयुष्यात या निवांत जगता यावे...


Rate this content
Log in