STORYMIRROR

DHANSHRI KABRA

Inspirational

3  

DHANSHRI KABRA

Inspirational

अस्तित्वाचा शोध

अस्तित्वाचा शोध

1 min
196

किती उत्कंठापूर्ण विचार आहे न हा??

अस्तित्वाचा शोध!!

स्वतःच्याच अस्तित्वाला नाकारणारे आपण,

आपण!! अस्तित्वाचा शोध घ्यायला निघालो आहे,

अस्तित्वाचा शोध घ्यायचा आहे ना,

खरंच घ्यायचा असेल तर;

आईच्या कुशीत डोक ठेऊन 

क्षणभर डोळे मिटून तर पहा,

वडिलांच्या मागे त्यांच्या गाडी/सायकल वर बसून 

एक निवांत फेरी मारून तर पहा,

आजीच्या जवळ झोपून 

एकदा तिच्या काळच्या गोष्टीत रमून तर पहा,

आजोबांचा चष्मा साफ करत 

त्यांचे गोड टोमणे स्वीकारून तर पहा,

मोठ्या बहीण/भावाच्या डोळ्यात 

आपल्या साठी जग जिंकून ठेवण्याची जिद्द तर पहा,

लहान बहीण/भावा सोबत 

खट्याळ पणे मनसोक्त तक्रार करून तर पहा,

आपल्याला मिळालेल्या सुटसाठीचे 

आत्याचे आपल्या वडिलांना बोलणे अनुभवून तर पहा,

कधीतरी आपल्या स्वर्गात (घरात) खरोखर मनमुराद जगून तर पहा!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational