STORYMIRROR

DHANSHRI KABRA

Tragedy Inspirational

4  

DHANSHRI KABRA

Tragedy Inspirational

आयुष्याचे सौंदर्य कळत नाही....

आयुष्याचे सौंदर्य कळत नाही....

1 min
227

आयुष्याच साैंदर्य मनाला काही कळत नाही,

प्रश्नांच्या नांदी लागून उत्तरांनाच प्रश्नात बदलणे मात्र थांबवत नाही..

मनालाही काही समजत नाही,

उत्तरांच्या शोधत आयुष्याला उत्तर ठाऊक नसलेले प्रश्न बनवणं मात्र थांबवत नाही..

कल्पनेच्या जगात रमून जगणं काही जमत नाही,

समजुतदारीच्या या जगात सुंदर बालपणाचं भोळ जगणं टिकवणं मात्र शक्य होत नाही..


स्वप्नांवरचा हक्क काही केल्या ह्रदयाकडून सुटत नाही,

दिवसरात्र चाललेल्या चक्रात या जगुनही जगता मात्र येत नाही..

नियतीचं बेतलेलं गणित मांडणे काही शक्य होत नाही,

आठवणीतलं अर्श्यासारखा खरं अन मुखवट्या सारखं खोटं बोलणं मात्र सुटत नाही..

मनातल्या घनदाट विचारांना टाळणं काही जमत नाही,

वेदनांच्या या जंगलातून पळून स्वतःचेच अश्रू पुसने मात्र जमत नाही..


हृदयातली सुखाची ओढ काही केल्या थांबत नाही,

जिकण्याच्या आशेत गुर्फटनाऱ्या पाऊलांना डोळ्यातली खंत लपवणे मात्र जमत नाही..

वेड्या मनाची जीवन बदलण्याची आस काही सुटत नाही,

काजळीच्या रात्री चंद्रासरखं प्रकाशमय होऊन वेळ बदलण्याची ओढ मात्र सोडत नाही..

हळव्या मनाला या भावनांचं गांभीर्य काही सुटत नाही,

आयुष्याचे साैंदर्य या शब्दात मोडून कागदावर चीतारणे शक्य मात्र होत नाही..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy