STORYMIRROR

DHANSHRI KABRA

Abstract Inspirational

3  

DHANSHRI KABRA

Abstract Inspirational

मैत्री

मैत्री

1 min
213

मैत्री...मैत्री कशी असावी??

मैत्री असावी...

मृगाकडे असलेल्या कस्तुरीसारखी,

फुलांत असल्येल्या गंधासारखी...

सागराकडे असलेल्या अथांगतेसारखी,

आकाशाकडे असलेल्या ध्रुव ताऱ्यासारखी...

काळोख्यातही फुलणाऱ्या रातराणीसारखी,

मैला पर्यंत सुगंध पसरवणाऱ्या मोगऱ्यासारखी...

उगवत्या सूर्याच्या कोवळ्या ऊनासारखी,

पौर्णिमेच्या चंद्राच्या शुभ्र प्रकाशासारखी...

मनाला उभारी देण्यासारखी,

सहवासाने फुळण्यासारखी...

मनाला नेहमी समाधान देण्यासारखी,

मनावर नेहमी राज्य करण्यासारखी...

श्वासांच्या स्पंदनात लहरी उमटवण्यासारखी,

शब्दांच्या पलीकडे जाऊन निभवण्यासारखी...

देव्हाऱ्यातल्या ज्योतीच्या तेजासारखी,

अत्तराच्या दर्वळणाऱ्या सुगंधासारखी...

निर्मळ निखळ पाण्यासारखी,

गगनाला भिडणाऱ्या कळसासारखी...

थकलेल्या मनाला सावलीसारखी, 

पाखराला असलेल्या पंखांसारखी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract