Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

DHANSHRI KABRA

Abstract

3  

DHANSHRI KABRA

Abstract

अस्तित्वाच्या शोधात!?!?

अस्तित्वाच्या शोधात!?!?

1 min
229


अस्तित्वाच्या शोधात!?!?

पहाटे पहाटे पापण्या उघटाच;

अस्तित्वाच्या शोधात तडफडायला लागतो,

सूर्यकिरणांची ऊर्जा मिळताच;

अनभिज्ञ अपेक्षांच्या शोधात भरकटायला लागतो...


ऊन सावलीच्या या उनाड जगण्यात;

जन्मंतरीच्या यशाच्या शोधात अनुभव वेचायला लागतो,

संघर्षाच्या खडतर काटेरी प्रवासात;

सौख्य कल्पनेच्या जगात सुखाच्या शोधात चालायला लागतो,

सप्तरंगी सौम्य आयुष्याच्या लालसेत;

क्षणभर समाधानाच्या नादात प्रसन्नता टाळायला लागतो...


असह्य वेदनांच्या तप्त्या उन्हात;

अथांग एकाकीपनात आपुलकीच्या शोधात घुसमटायला लागतो,

सांजवेळी नकळतपणे सुटनाऱ्या उजेडात;

निशब्द भावनांच्या शोधात क्षणोक्षणी घुसमटायला लागतो....


अज्ञात सांकोचाच्या काळोख नभपटलात;

जबाबदारीच्या निराळ्या जाणिवेच्या शोधात 

स्वतःलाच छळायला लागतो,

वाकुड अजाण कसोटीच्या अंधारात;

चमचमत्या चंद्र ताऱ्यांच्या प्रकशात

आत्मविश्वासाच्या शोधात जगायला लागतो,

सावकाशपणे परतणाऱ्या उषःकालात;

पुन्हा एकदा नव चैतन्याच्या शोधात दरवळायला लागतो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract