STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

दिवाळीचा फराळ

दिवाळीचा फराळ

1 min
135

फराळाचे आकर्षण

सदा सर्वांना नेहमी

गोड असो वा तिखट

नक्की आवडीची हमी


कुणी सुगरण घरी

कष्ट प्रेमाने करते

स्वाद तयाचा सर्वत्र

घरोघरी दरवळे


कडबोळी नि चकली

लागे खमंग जिभेला

लाडू करंजी चिरोटा

गोड मधुर जिव्हेला


व्यवसाय पोटासाठी

जन अनेक करती

द्यावे प्रोत्साहन तयां

लयलूट खरेदीची


घ्यावा आस्वाद सुखाने

नका विसरु गरीबां

घासातला घास द्यावा

पुण्य अन्नदान जाणा


करु फराळ मिळूनी

मन मोठे ठेवूनिया

बंधुभाव मनामधे

माणुसकी जपुनिया



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract