STORYMIRROR

Smita Murali

Inspirational

3  

Smita Murali

Inspirational

दिवाळी

दिवाळी

1 min
1.3K


दिवाळी तुमची आमची


थंडीच्या मोसमात

आली आली दिवाळी

अंधाराला पळवते

दिव्यांची झळाळी


ऐपतीप्रमाणे सजली

तुमची आमची घरे

फुल तोरणांनी सजली

रंगीत रांगोळीची दारे


फराळाची गोडी निराळी

तुमच्या आमच्या घरची

लाडू चिवडा चव चाखावी

देवघेव रीत ही संस्कृतीची


शुभेच्छांचा वर्षाव वाढवी

आपल्या नात्यातला गोडवा

पाच दिवसांचा सण दिवाळी

चौथ्या दिवशी असे पाडवा


भाऊबीज पाचवा दिन

बहिणी जातात माहेरी

बंधुस उटणेस्नान घालूनी

मनोभावे औक्षण करी


तुमची आमची दिवाळी

साजरी होते अशीच सेम

दिपोत्सव वाढवत जातो

तुमच्या आमच्यातले प्रेम


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational