STORYMIRROR

Varsha Kendre

Action Inspirational

2  

Varsha Kendre

Action Inspirational

दिवाळी

दिवाळी

1 min
186

वर्षभरातील सण मोठा 

आहे दिवाळी मानाचा 

मना मनाचे नाते जोडावे 

सन्मान करू आपल्यांचा. . 1


 नाते नवीन जोडू या 

जुनी नाती टिकऊ या 

सज्जनांची जपून मने 

आदर्श जगी पसरवू या. . .2


 भेटवस्तू शुभेच्छा संदेश 

वाढवी नात्यातील गोडवा

 गोड चविष्ट फराळाने 

आपुलकी भाव वाढवा. . .3


 दिवाळी सहा दिवसांची 

 दिव्यांनी सजवू या 

 अंगणाची शोभा वाढविण्या

  रांगोळ्या काढू या. . .4


 झेंडू फुले, तोरणे 

दीपमाळा लावू या 

नवीन वस्त्र लेऊनी 

पूजा पाठात रमू या. . 5


 फटाक्यांच्या आतषबाजीस 

आळा चला घालू या 

ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण 

टाळण्यासाठी पुढे होऊ या. . 6


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action