STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

दिवाळी कालची आणि आजची

दिवाळी कालची आणि आजची

1 min
24

दिवाळी कालची आणि आजची... " पुष्पाग्रज " काळ बदलला,बदललं सगळं,बदलली दिवाळी, कालची दिवाळी होती वेगळी,आजची आहेच वेगळी. बालपणी होती हौस,आजोळी जाण्याची फार , आजीआजोबा,मामामामी होतं प्रेम अपार. आत्या,मावशी,मामा,मामी घर भरुन जायचं, मायेचा होता ओलावा,मन नात्यात रमायचं. कितीही असली गरीबी मनाची श्रीमंती होती, आजच्यासारखी नव्हती मुळीच कोरडी नाती. माणूस झाला छोटा,पैसा झाला मोठा, कोणी कुणाला भाव देईना जो तो अप्पलपोटा. कालची,आजची दिवाळी आहे वेगवेगळी , नाही मायेचा ओलावा,झाली नाती दूर सगळी. घर अंगण भरुन जायचं माणूस नात्यात रंगून जायचा, दिवाळीचा सण तेव्हा खऱ्या आनंदात साजरा व्हायचा. फटाक्याचा होतोय बार,माणूस मात्र फुसका झाला, उधळण होते पैशाची ,किंमत नाही माणसाला. नाती जपा,माया ठेवा जरी दिवाळी रोजची, खरच आहे वेगळी दिवाळी कालची,आजची...! गायकवाड रविंद्र गोविंदराव, दापकेकर ,जि.नांदेड मै9834298315


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract