STORYMIRROR

Smita Murali

Inspirational

3  

Smita Murali

Inspirational

दिवाळी बळीराजाची

दिवाळी बळीराजाची

1 min
492


दिवाळी बळीराजाची


बाप माझा बळीराजा

अठराविश्वे दारिद्र्याचा धनी

आज कवितेतून व्यक्त झाली

बळीराजाची लेक ही लहानी


नसे ही आज कल्पनेतील

तुम्हाला भावेल अशी कथा

पोटच्या पणत्यांच्या तेजासाठी

वातीसम जळलेल्या बापाची व्यथा


म्हणे दिवाळ काढणारी दिवाळी

फुटक्या पणत्यांनी झोपडी नटे

बाप कर्जाचा डोंगर रचायचा

तेंव्हा फराळ, कपडा भेटे


नावाचाच एकरी मालक बाप

पावसाविना कोरडी ठिकर शेती

लेकीबाळींना पोसता पोसता

एक दमडीही ना राही हाती


दरवर्षी दारिद्रयचक्रातली

बळीराजाची अशी दिवाळी

जगाचा पोशिंदा असूनही आज

बनतोय तोच परिस्थितीचा बळी!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational