STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

धुंद मिठी

धुंद मिठी

1 min
264

साक्ष आपुल्या प्रेमाची

मिठी ती मंतरलेली

विसरुन आसमंत

अनुभूती प्रेमातली  (१)


प्रेम निखळ चांदणे

शुभ्र शीतल मृदुल

कर पडता गळ्यात

गंध उमले अतल   (२)


स्पर्श फुलवी रोमांच

किती नहावे तयात

रोमरोम उमलले

तृप्त दोघेही मनात   (३)


वेडी खुळीच आपुली

प्रीतवेल बहरली

खूणगाठ मनातली

मनालाच उमजली   (४)


रम्य विश्व मिठीतले

मिठीतच उमलले

घट्ट मिठीत सामावे

सुख अद्वैतामधले   (५)


प्रेमातल्या ' त्या ' मिठीची

आठवण मनांतरी

धुंद विश्व प्रेमिकांचे

मनःपटलावरती     (६)


जाता मी दर्याकिनारी

आठवांचा साठा ऊरी

प्रीत कोकण भूमीत

उमलली विरलीही    (७)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract