धुंद मी बेधुंद मी
धुंद मी बेधुंद मी
सोडून बंधने असी
वागेन का मी तसी?
तोडेल सारे पाश मी
धुंद मी बेधुंद मी ......
स्वैर झाले केस तरी
पक्षी ही मुक्त जरी
हेवा त्या वाऱ्यासही
धुंद मी बेधुंद मी ......
लपवली लाज असी
बाहुपाशात मी कसी
माझ्यातच आज ना मी
धुंद मी बेधुंद मी........
श्वासात गंध तुझा रे
तुझेच अस्तीत्व मी
माझ्यात तू तुझ्यात मी
धुंद मी बेधुंद मी.........

