STORYMIRROR

Pavan Pawar

Abstract Fantasy Inspirational

3  

Pavan Pawar

Abstract Fantasy Inspirational

धराधीश

धराधीश

1 min
182

लेकरांच्या यशासाठी जो राबतो उन्हात,

पोटाचा मारा करणाऱ्याला बाप म्हणावे तयास.

शरीराची करतो झीज आपल्या अवलादीसाठी,

भविष्य होणार सुखाचे न जगी जो स्वतःसाठी.


तशी मायही मिळाली साडीला फाटका पदरं,

खर्च भागावर लेकीचा म्हणून फिरे शेत दारं.

नव्हता जीवाला आराम या कष्टाच्या जगातं,

दिस रात नाही बघत जेव्हा राबतो शेतातं.


नव्हता सुखाचा घास माया व्हती भरपूर,

आदर मनात दिसायचा डोळ्यात अश्रूंचा पूर.

विळ घेतला धड्याचा जीवनाच्या साखळीत,

धन्य धन्य ते माऊली ज्या मिळाल्या जगात.


दिली दिशा जीवनाला वळण विकृत विचाराला,

साथ नव्या आदर्शाची ध्येय लाभले जीवनाला.

नाद केला यशाचा या जीवन साखळीत,

निःस्वार्थ वृत्तीचे मिळाले या देशाला धराधीश.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract