धोंड्याचा महिना
धोंड्याचा महिना
कुणी म्हणा पुरुषोत्तम मास
कुणी अधिक महीना म्हणा
आम्ही तर धोंडाच म्हणणार
कारण येतो जावई पाहुणा
कुणी म्हणे, 'दान धर्म करा'
बोलवा लेक नि जावयाला
पुरण घालून धोंडा बनवा
त्यात थोडेसे सोनेही घाला
होऊ द्या खर्च कितीही
त्याची काळजी नका करू
पुण्य जमा होईल खात्यात
त्याला हिशेबात नका धरू
साधू संतांनी काय सांगितले
आणि आम्ही काय ऐकले
नारळ फोडून करवंटी हाती
आतील खोबरे बाहेर फेकले
दान करावे अतिशय गुप्त
कळू नये डाव्याला उजव्याचे
अधिक मासात अधिक काम
करावे संस्कृतीचे अन् देवाचे
