STORYMIRROR

Suhas Bokare

Inspirational Others

4  

Suhas Bokare

Inspirational Others

धनी, मी तुमचा स्थलांतरित श्रमिक

धनी, मी तुमचा स्थलांतरित श्रमिक

1 min
23.4K

छिन्न विछिन्न दिसतो आम्ही 

दिसती ते कधी नसताशी 

तुझे हृदय तुज पोखरती 

आमची वाट स्वर्गाची


काळ स्पर्श हा अनंती लाभी 

थोडक्यातच तू हरलास 

जिथे प्रतिकार करायचा 

तिथे तू जागीच थबकलास


माझा जन्म हा कष्टासाठी

काय बिशाद कोणाची 

जन्म देऊनिया व्याघ्र पोसिला 

गर्दी नाही शामळू अजांची


त्या प्रासादांच्या त्या वाटा 

माझ्या रक्ताने बांधिल्या 

तुज बांधिती अफाट लाटा 

माझा संवाद मुक्त नभांशी


तुझ्या अदृश्य कारवाया 

तुज नेती पायथ्याशी 

माझी काया हे एक मंदिर 

अलंकृत जखमा कळसासी


आज आपुल्या या हातांनी, 

अन्यायी कास का धारावी 

देवाजवळ असती न्याय 

तुझी चीड तरी का पोसावी


मान मारतबाच्या त्या बाता 

वांझोटे दुःख तू सोशीशी 

अश्वत्थामाची ती दैना त्याची 

माझी तर झुंज माझ्याशीच


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational