धीर
धीर
काळवंडले सारे आसमंत
तू अस्ताचली ढळताना
ओसरले तेज तुझ्या ओठीचे
मजा बाय बाय करताना...
नको इतकाही निस्तेज होऊ
कोणीही येऊनि तुझ छेडावे
काय म्हणोनी होतोस हिरमुसला
उद्या नशिबी आहेच पुन्हा उगवणे...
आजचे नैराश्य तुझे
क्षणात रे दूर होणारं
तेजोमय ऊर्जा तुला रे
तो पुन्हा भगवंत देणारं...
म्हणोनी सांगतो तुला
पुन्हा पुन्हा ठणकावून
येशील तू ही पुन्हा पूर्व क्षितीजावरी
तेजोमय उल्हसित होऊन...!
