STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

धबधबा

धबधबा

1 min
394

धबधबा...!!!


धबधबा सुविचारांचा

अखंड ओसंडून पडू दे

संस्काराची पेरणी पुन्हा

नव्या पिढीत होऊ दे


नको त्या आचार विचारांची

पायमल्ली होऊ दे

अनुकरणास अविचारांच्या

पायबंद बसू दे


शहरी संस्कृतीचा वावर

शहरातच आता राहू दे

ग्रामीण भागाच वैभव

या पुढे चिरंतन अबाधित राहू दे


प्रसार माध्यमांचा वापर

चांगल्या साठी राहू दे

वाईट ते सारे नजरे आड

सदैव होऊ दे


भान लेखणी ला

परिणामांचे राहू दे

तळपती लेखणी

चांगल्या साठीच कागदावर उमटू दे


अज्ञानात सुद्धा सुख असते

हे सुक्षितांना कळू दे

भ्रूण हत्या असो वा शोषण असो

त्याचा गवगवा थांबू दे


आई होणं बाप होणं

आपलं नशीब असत हे आता कळू दे

सौभाग्य अपत्य सुखात असत

हे ही आता उमजू दे


दैव देत कर्म न्हेत 

हे काही खोटं नाही

ठेच लागल्या शिवाय

अक्कल पण येत नाही


असेल ते असेल नशीब देवा

सद् मार्गाने जीवन जगू दे

चांगल्या साठी 

सदैव अविरत धडपड होऊ दे


लेखणीला सुद्धा चांगल

सद् विवेकाच कोंदण लाभू दे

कोंदणात त्या भक्कम

सद् विचारांचं तेज खुलू दे....!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational