STORYMIRROR

Rohit Khamkar

Inspirational

3  

Rohit Khamkar

Inspirational

धागा

धागा

1 min
246

फक्त बहीण नाहीस तू, होतीस माझी आई.

रक्षाबंधनाला आज, राखी बांध ना ग ताई.


नसतेस आता जवळ, गेली आहेस सासरी तूझ्या.

सगळ्या आठवणी तश्याच आहेत, साठवणीत माझ्या.


होतीस कायम पाठीशी, आताही आहेसच.

मी कायम तुझ्या मायेखाली, सतत तुझ्या मायेतच.


झालीस कधी गुरु, तर कधी झालीस पितृतुल्य.

तुझे बोट धरून चालताना, जपतो सगळी मूल्य.


नसलो आपण जवळ जरी कोणत्याही कारणाने, आडवणार नाही कोणतीही बाधा.

सण खरा एक दिवसाचा, पण माझ्यासोबत सदैव तुझ्या मायेच्या राखीचा धागा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational