देवदूत
देवदूत
काही दिवसांपासून माणसाच्या मानगुटीवर बसलंय एक भूत
पोलीस डॉक्टर नर्स पत्रकार सारेच बनून आले देवदूत
डॉक्टर रुग्णांची करी तपासणी देवदुत बनून बसले दवाखान्यात
त्यांना नाही जराशी ही फुरसत पाहण्या काय चाललंय घरात
उगीच घराबाहेर निघू नका सरकार सांगते बातम्यामधून
रात्रंदिवस संरक्षण देऊन बनले देवदूत पोलीस खाकी वर्दीतून
आपले जीव धोक्यात घालून घरबसल्या बातम्या देई सर्वाना
जीवाची पर्वा नाही त्याला माझा सॅल्युट सर्व पत्रकारांना
लोकांच्या हाताला नाही काम सारे व्यवहार झाले आहे ठप्प
दानशूर लोकांनी दिले अन्नधान्य देवदूत बनून आले बसले नाही गप्प
हे ही संकट टळून जाईल थोडा संयम राखावा सर्वांनी
वेळच त्याच्यावर औषध आहे जिंकू नियमाचे पालन करुनी
