Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Dhumane

Children

3  

Chandan Dhumane

Children

देवाला प्यारी लेक माझी

देवाला प्यारी लेक माझी

1 min
256


संसार फुलला गोड माझा

पती आहे प्रेमळ खूप ,

संसारवेलीवर दोन फुले फुलले

बहिण भाऊ पाहून जगण्यास वाटे हुरुप


 गोड संसाराला लागली नजर

मुलगी माझी गुड्डू होती छान ,

अचानक पडली आजारी खूप

आठ महिन्याची कसले नाही भान..


ईलाज होता चालू तरी

दुखणे काही समजेना ,

निमोनियाची केले उपचार ,पण

तिला बरेच काही वाटेना...


एक दिवस खूपच लागली रडायला

आम्हाला काही नव्हते समजत ,

दवाखान्यात केले अँडमीट तेव्हा

 मेंदूज्वर झाल्याचे कळले निदानात .


चोविस तासात खेळ झाला

जीव काळजीने थरथरला असा ,

देवाला प्यारी झाली लेक माझी

स़ागा हा नियतीचा खेळ कसा...?


माझ्या परी राणीसाठी माझा जीव

अजुनही खूपच कासावीस होतो ,

सोळा वर्षे उलटली तरी आठवणीत

 माझा जीव तिच्यासाठी सदैव झुरतो..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children