STORYMIRROR

Sailee Rane

Inspirational

4  

Sailee Rane

Inspirational

देव तेथेचि जाणावा

देव तेथेचि जाणावा

1 min
247

करता सोहळे त्या देवाचे

दगडालाच देव जाणून

पाप-पुण्याचा लेखाजोगा

त्याच्याच पदरी सोडून


दगडाला फासून शेंदूर

देवपण आणायला धावता

परी त्या भुकेकंगालांना

का ओ असे विसरता


देवाला प्रसन्न करण्या

नैवेद्याचे सोहळे करता

तोच घास दिला त्या गरिबाला

हर्षाने डोलेल ती निरागसता


सोहळे देवाचे जरूर करा

परी जतन त्या मूल्यांचे करा

देवघरच्या त्या फुलांचे

चला भवितव्य उज्वल करा


देव शोधू नका दगडात

तोचि माणसात मानावा

दीन दुबळ्यांची करा सेवा

देव तेथेचि जाणावा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational