STORYMIRROR

Bharati Sawant

Abstract Others

4  

Bharati Sawant

Abstract Others

देणं सृष्टीचं

देणं सृष्टीचं

1 min
193

जीवनातल्या संकटांवर 

करूया ठामपणेच मात

जीवन नको घालवू वाया

होईल जीवसृष्टीचा घात 


ओढा खळखळ दऱ्यांतूनी

वाहती इवलाले निर्झर 

ओढा मायचा लेकरांसाठी

फुटतो प्रेमालाच पाझर


जहाज तरंगते जलात 

खाई हेलकावे सागरात

जहाज वाळवंटीचा उंट

राही पाण्याविना दिनरात


काठ नदीचा गं भरलेला 

चल सजनी येऊ फिरूनी 

काठ जरतारी लुगड्याचा

घेते मोरचित्रांनी भरूनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract