डॉक्टर ( सहाक्षरी )
डॉक्टर ( सहाक्षरी )

1 min

11.8K
डॉक्टर तुम्हीच
खरे वॉरिअर
कोरोना लढयात
सदा अग्रेसर
बाधीत व्यक्तीला
तुमचा दिलासा
आत्मविश्वासाचा
हात तो जरासा
तुम्हीच आहात
हो जिवनदाते
जुळलेय आता
वेगळेच नाते
स्टेथेस्कोप पेन
विश्रांती घेतोय
डॉक्टर तरीही
सेवाच देतोय