STORYMIRROR

Smita Murali

Inspirational Others

3  

Smita Murali

Inspirational Others

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

1 min
15.5K


जातीपातीचं राजकारणं

किती सोसला अपमान

तुम्ही ज्ञानाच्या जोरावर

जगी मिळविला सन्मान


जन्मभर झिजवुन काया

गाळला कष्टाचा घाम

तुमच्या समाजकार्याला

करते मानाचा सलाम


ग्रंथ पुस्तकाशी मैत्री

मारली ज्ञानाची भरारी

दीन दलित अबलांचे

तुम्ही बनलात कैवारी


दूर करण्या तो अन्याय

दूत धाडला रे माझ्या देवा

ज्याच्या अथक कष्टांनी

मिळाला संविधानरुपी ठेवा


एकजूट आणि संघर्ष

सोबत शिक्षणाचा मंत्र

साऱ्या जगाला शिकवले

तुच सक्षमतेचं भीमा तंत्र


धन्य आई बाप नि कुळ

धन्य आम्ही तुझी जनता

तुच आमचा खरा देव

तुच भाग्याचा विधाता


तुझी लेकरं आम्ही सारी

देतो तुला आज अभिवचन

जगी चालवू तुझा वारसा

माणूसकीचं करुन जतन


दीन दुबळ्या जनतेसाठी

करु आजन्म आम्ही कार्य

तुझे विचार सदा सोबती

देती लढण्याला रे धैर्य


आमच्या समाजकार्यातून

तुझे विचारांना आम्ही रुजवू

ज्ञान मिळवून अफाट

जगी मानाचं राज्य गाजवू!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational