STORYMIRROR

Suvarna Pandharinath Walke

Inspirational

2  

Suvarna Pandharinath Walke

Inspirational

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

1 min
166

साहेब तुमचा हा लढा

गलिच्छ कामे करणाऱ्या

अस्पृश्यांच्या हक्कासाठी


मनूूच्या व्यवस्थेेेनंं

जखडलेल्या माणसांसाठी

भुकेलेल्या जीवांसाठी


अनिष्ट प्रथातून

भाजूून निघली

लालबुंद त्या विस्तवानं


अस्पृश्यांच्या जिंदगीवर

प्रहार_

निर्धार करूनी दुरावला

अंधार


तुम्ही रेखाटत गेलात

शब्दांचा दोर

पेटत गेलात घनघोर


तुमचा आवाज

प्रत्येकांच्या कानी पोहचला

"शिका, संघटित व्हा,

आणि संघर्ष करा!"


या देशाला

हलवून टाकीन

शोषित- पीडित माणसांच्या

मुक्तीसाठी


तुम्ही पेटवलास

उच्च वर्गाचा गुलाम झालेल्या

माणसांचा महालढा

आणि

कडाडून जागे झाले

अन्याय शाेषित

प्राण भुकेलेले


साहेब

सातासमुद्रापलीकडेेे 'विद्वान'

म्हणून तुमचेच नाव

शोधते आहे असा

कोणता व्यक्ती

जो संविधानाची

करतो जीवेभावेे भक्ती


कोठूनी प्राप्त झाले हे

अमृततुल्य ज्ञान

तडफडणार्‍या जीवांना मोकळे

केले रान

उत्कृष्ट ग्रंथ तुमचे

'संविधान'


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational