डोळ्यात अश्रू आले
डोळ्यात अश्रू आले
आई आज तू जवळ नसल्याने
डोळ्यात अश्रू आले,,,
आज मी हॉस्पिटलमध्ये
पलंगावर झोपले होते,,,
अचानक पोटात दुखायला
लागले होते,,,
डॉक्टरांनी सांगितलं सलाईन
लावावे लागेल,,,
हे ऐकताच,,,,
मनात धडधड करायला लागल
पलंगावर झोपताचं,,
तुझा चेहरा डोळ्यासमोर आला,,
तुला जोराची हाक मारावी,,,,,
तू माझ्या जवळ येेऊन बसव,,,
असं वाटायला लागलं,,,
मन माझं तुला हॉस्पिटलमध्ये
सर्वकडे शोधत होत,,,,
पण तू मात्र कुठेच नव्हतीस,,,
डोळ्यात अश्रू होते,,,
मनात तुझिया आस होती,,,
तू माझ्याजवळ नव्हतीस,,,,
आई तू माझ्यापासून दूर का आहेस,,,,
आज खूप वाईट वाटत आहे,,,,
तुझ्यापासून दूर असल्याच
खूप दुःख पण आहे,,,
